सभेचे इतीव्रुत्त
मागील सभा दिनांक 09/03/2012 च्या सभेचे इतीव्रुत्त कायम करण्यात आले.
मागील सभेतील निव्रुत्तीवेतन धारकांनी मांडलेल्या अडचणींचे संपुर्ण निराकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले व त्यावर निव्रुत्तीवेतनधारकांनी समाधान व्यक्त केले.
विहीत मुदतीत ओळखतपासणी करिता उपस्थित राहण्याबाबत सुचना देणे.
जे निवृत्तीवेतनधारक वारंवार स्मरणपत्र पाठविल्यानंतरही ओळखतपासणीकरीता कोषागार कार्यालयात हजर झाले नाही अशा निवृत्तीवेतनधारकांची यादी निवृत्तीवेतन संघटनेच्या पदाधिकारी यांना देण्यात आली व त्यांना अशा निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन सुरू करण्याबाबत पाठपुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले.
माहे जून 2012 च्या निवृत्तीवेतनासोबत सहावे वेतन आयोगाच्या चौथ्या हप्याचे प्रदानाबाबत सुचना देणे
उपस्थित निवृत्तीवेतनधारक तसेच निवृत्तीवेतन संघटनेच्या पदाधिकारी यांना माहे जून 2012 च्या निवृत्तीवेतनासोबत सहावे वेतन आयोगाच्या चौथ्या हप्याचे प्रदानाबाबत सुचना देण्यात आल्या.
उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निराकरण करणे.
मेळाव्यामध्ये भारतीय स्टेट बॅक, आर्वी शाखेमार्फत निवृत्तीवेतन घेणारे श्री शरद घाटोळ यांनी त्यांनी विकलेल्या निवृत्तीवेतनाची पुर्नस्थापना करतेवेळी या कार्यालयाची चुक कोषागाराच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्याच्या लेखापरिक्षण नोंदवही तपासून त्याप्रमाणे दुरूस्ती करण्यात आली व त्यांना देय असलेल्या अंशराशीकरणाच्या थकबाकीचे प्रदान त्यांना माहे जून 2012 च्या नियमीत निवृत्तीवेतनासोबत करण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. त्याच्या विनंतीनुसार लगेच कार्यवाही करण्यात आल्याने त्यांनी आभार प्रकट केले.
तसेच ज्या निवृत्तीवेतन धारकांना संयुक्त खात उघडायचे होते असे सभेमध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर लगेच कार्यवाही करुन त्याबाबत बँकेला पत्राद्वारे कळविण्यात आले. तसेच मेळाव्यामध्ये हजर निवृत्तीवेतनधारकांनी सभेमध्ये मांडलेल्या अडचणींचे सभेमध्येच तत्परतेने निराकरण करण्यात आले. त्याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार अधिकारी वर्धा यांचे आभारही मानले.
सभेच्या शेवटी आभारप्रदर्शन करुन सभा समाप्त झाल्याचे घोषीत करण्यात आले व पुढची सभा दिनांक 07/09/2012 ला घेण्यात येईल अशी सूचना निवृत्तीवेतन संघटनेचे पदाधिकारी व निवृत्तीवेतन धारकांना देण्यात आली.
कोषागार अधिकारी,
वर्धा
No comments:
Post a Comment