Pages

Friday, 25 October 2013

About Idendification prosses of Pensioner

                           निवृत्तीवेतन धारकांची ओळख प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत

              नविन निवृत्तीवेतन धारकांनी आपल्याला निवृत्तिवेतनाची रक्कम अदा करता यावी याकरीता
 ओळख पटविण्यासाठी  खालील कागदपत्रे /माहितीसह स्वतः या कार्यालयात उपस्थित राहावे व संबधिंत
 निवृत्तीवेतनलिपिक यांच्याशी संपर्क  साधावा . 
१)महालेखापाल  मुंबई / नागपूर यांच्याकडून प्राप्त  झालेले प्रधीकारापात्राची प्रत ( P.P.O )
२) राष्ट्रीयकृत बँकेचे निवृत्तीवेतन धारकांसाठी उघडलेल्या नविन खात्याचे पासबुक (Pension Acount )
३) निवृत्तिवेतनावर परिणाम होईल अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे निवृत्तीवेतन मंजूर
     करणाऱ्या  प्राधीकाऱ्याचे  प्रमाणपत्र .
४) तात्पुरते निवृत्तीवेतन , तात्पुरते अंशराशीकरण ,तात्पुरते उपदान मंजूर / प्रदान केले अथवा नाही या  
     बाबतचे  निवृत्तीवेतन मंजूर करणाऱ्या  प्राधीकाऱ्याचे  प्रमाणपत्र ,  निवृत्तीवेतन इतर जिल्यातील
     आस्तापनेवरून   निवृत्तीवेतन झाल्यास संबंधित जिल्याच्या कोषागारातून हे प्रमाणपत्र साक्षांकित करून
     आणावे .
५) पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र , पुनर्नियुक्तीबाबतचे प्रमाणपत्र.
६)रुपयाचा राजस्व मुद्रांक ( रेव्हेन्यु  तिकीट )
७) नामनिर्देशन पत्र (दोन प्रती )
८) जर  निवृत्तीवेतन धारकाने स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तर त्या दिवसाचे वेतन घेतले किंवा त्याबाबतचे
    प्रमाणपत्र
९) निवृत्तीवेतन धारक सज्ञान नसल्यास / मानसिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यामुळे
     ,पालकांच्या नावे निवृत्तीवेतन मंजूर असल्यास त्यांच्या पालकांचा सोबत असलेले  छायाचित्र व प्रतिभूती
    बंधपत्र (endemniti bond )
१०) जर निवृत्तीवेतन धारक मानसिक दृष्ट्या व  शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यामुळे तसेच इराजा
       निवृत्तीवेतन  (इञ्जुअरि निवृत्तीवेतन) मंजूर झाली असल्यास त्याबाबतचे वैदकीय प्रमाणपत्र जर
      पालकांच्या नावे निवृत्तीवेतन मंजूर असल्यास त्यांच्या पालकांच्या सोबतअसलेले छायाचित्र व प्रतिभूती
      बंधपत्र (endemniti bond )
११) केंद्र / राज्य शासनाकडून इतर निवृत्तीवेतन मंजूर झाली असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र.
१२) PAN card  ची छायांकित प्रत.
१३) निवृत्तीवेतन मंजूर करणाऱ्या प्राधीकाऱ्याकडून ना वसुली प्रमाणपत्र.
१४) आधार कार्डची छायांकित प्रत.

                  उपरोक्त सर्व कागदपत्रे ओळखपटवीन्याकामी  आवश्यक आहेत. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर ओळख पटविण्याचे काम करण्यात येईल.



 

No comments:

Post a Comment