वर्धा कोषागारातून निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय / इतर राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की , सन २०१३-१४ या वर्षाकरिता निवृत्तीवेतन धारकांचे हयातीबाबतचे प्रमाणपत्राची यादी या कोषागार कार्यालयातून या कोषागाराअंतर्गत असलेल्या सर्व अधिकोषामध्ये ( बँकेत ) पाठविण्यात आलेली असून निवृत्तीवेतन धारकांनी दि . ०१/११/२०१३ ते १०/१२/२०१३ पर्यंत संबंधित अधिकोषामध्ये जावून आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच पुनर्नियुक्त / पुनर्विवाह बाबतचे प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत स्वतंत्रपणे सादर करणे आवश्यक आहे . वरील मर्यादेमध्ये निवृत्तीवेतन धारकांनी काही कारणास्तव अधिकोषामध्ये जाऊन आपल्या नावासमोर स्वाक्षरी न केल्यास दि. १५/१२/२०१३ पर्यंत या कोषागार कार्यालयात येऊन आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी अन्यथा निवृत्तीवेतन स्थगित करण्यात येईल व हयातीबाबाताचे प्रमाणपत्र या कोषागार कार्यालयात सादर केल्यानंतरच निवृत्तीवेतनाचे प्रदान करण्यात येईल . याबाबत सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दक्षता घ्यावी .
No comments:
Post a Comment