वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Tuesday, 12 November 2013

IMFORMATION ABOUT LIFE CRTIFICATES

                      वर्धा  कोषागारातून  निवृत्तीवेतन / कुटुंब  निवृत्तीवेतन  घेणाऱ्या राज्य शासकीय / इतर राज्यशासकीय  निवृत्तीवेतन  धारकांना सुचित करण्यात येते की , सन २०१३-१४ या वर्षाकरिता   निवृत्तीवेतन   धारकांचे  हयातीबाबतचे  प्रमाणपत्राची  यादी  या  कोषागार कार्यालयातून या कोषागाराअंतर्गत  असलेल्या सर्व अधिकोषामध्ये ( बँकेत ) पाठविण्यात आलेली असून   निवृत्तीवेतन धारकांनी                    दि . ०१/११/२०१३  ते १०/१२/२०१३ पर्यंत  संबंधित अधिकोषामध्ये जावून आपल्या  नावासमोर  स्वाक्षरी करावी.   तसेच  पुनर्नियुक्त  / पुनर्विवाह बाबतचे प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत स्वतंत्रपणे  सादर  करणे आवश्यक   आहे .  वरील  मर्यादेमध्ये  निवृत्तीवेतन धारकांनी काही कारणास्तव अधिकोषामध्ये जाऊन आपल्या नावासमोर स्वाक्षरी  न  केल्यास दि.  १५/१२/२०१३ पर्यंत या कोषागार कार्यालयात येऊन  आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी  अन्यथा निवृत्तीवेतन स्थगित करण्यात येईल व हयातीबाबाताचे प्रमाणपत्र या  कोषागार कार्यालयात सादर केल्यानंतरच निवृत्तीवेतनाचे प्रदान करण्यात येईल . याबाबत सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दक्षता घ्यावी . 

No comments:

Post a Comment