Pages

Friday, 21 February 2014

निवृत्तीवेतन धारकांना सूचना 

१) निवृत्तीवेतन धारकांच्या विकलेल्या निवृत्ती वेतनाच्या ( अंशराशिकरन ) (commuted pension ) संदर्भात ज्या दिवशी ओळख तपासनी  झाली किंवा प्रदानाच्या दिनांकापासून १५ वर्षापर्यंत कपात होते व ते पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीवेतन धारकाने अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर विकलेल्या निवृत्तीवेतनाचे  निवृत्तीवेतनात समावेश करण्यात येते.

२) निवृत्तीवेतन धारकांनी दरवर्षी निवृत्तीवेतन  घेत असलेल्या बँकेत कोषागारामार्फात पाठविण्यात         येणा-या     हयातीच्या यादीवर नोव्हेंबर महिन्यात स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे . ज्या निवृत्तीवेतन धारकांनी सदर यादीवर स्वाक्षरी केली नाही त्यांचे निवृत्तीवेतन माहे डिसेंबरमध्ये थांबविण्यात येते.
३)ज्या निवृत्तीवेतन धारकांना आपले निवृत्तीवेतन  इतर जिल्हा कोषागाराला स्थानांतरीत करावयाचे आहे त्यांनी ज्या बँकेतून निवृत्तीवेतन  घेत आहेत त्या बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र व अर्ज या कोषागारास सादर करावे . (A.G. बदलत असल्यास P.P.O.  ची मुळ प्रत अर्जासोबत सादर करावी .)

४) ज्या निवृत्तीवेतन  धारकांना आपले निवृत्तीवेतन जिल्ह्यातीलच इतर बँकेत स्थानांतरीत करावयाचे आहे त्यांनी साध्या ज्या बँकेतून निवृत्तीवेतन  घेत आहेत त्या बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र व अर्ज या कोषागारास सादर करावे . तसेच ज्या नवीन बँकेतून निवृत्तीवेतन घेणार आहे त्याचे नवीन काढलेले पासबुकाची छायाप्रत अर्जासोबत सादर करावी. परस्पर बँक स्थानांतरीत करता येणार नाही .

५)ज्या निवृत्तीवेतन धारकांना वृद्धापकाळामुळे बँकेत निवृत्तीवेतन घेण्याकरिता जाने शक्य नाही त्यांनी आपल्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या नावे ( पत्नीच्या ) संयुक्त खाते करता येईल. त्यासाठी १०० रु च्या stamp पेपरवर शपतपत्र  व अर्ज या कोषागारास सादर करावे व रीतसर परवानगी घेऊन संयुक्त खाते करवे.

६) निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास या कोषागाराला निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यू दाखल्याची छायाप्रत व कुटुंब निवृत्तीवेतन सुरु करण्यासाठी अर्ज सादर करून सूचना द्याव्या व म. को. नि. नमुना ४१ कोषागारातून प्राप्त करून घ्याव्या व कोषागारामार्फात मिळालेल्या सूचनांचे पालन करावे .

7) कुटुंब निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांनी या कार्यालयाला निवृत्तीवेतन बंद करण्यासाठी अर्ज करावा व सोबत   मृत्यू दाखल्याची छायाप्रत जोडावी .

८) या कार्यालयात  निवृत्तीवेतना संबंधी कोणतीही तक्रारी किंवा आक्षेप विचारणा करण्यासाठी येत असतांना   निवृत्तीवेतनाचे पासबुक   अद्यावत नोंदी करून यवे.

९) मृत्यू-नि-सेवा उपदना संदर्भात देयके हे   निवृत्तीवेतन धारकाच्या संबंधित कार्यालयामार्फत कोषागाराला साद्ज होत असल्याने   निवृत्तीवेतन धारकाचे   निवृत्तीवेतन प्रकरण आल्या नंतर एक वर्षाच्या आत कोषागाराला सादर करणे आवश्यक आहे. सदर देयके सादर करणे हे संबंधित कार्यालयाची जबाबदारी असल्याने निवृत्तीवेतन धारकाने कोषागाराशी संपर्क न साधता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा .

१०) ज्या निवृत्तीवेतन धारकाचे निवृत्तीवेतना पासून मिळणारे उत्पन्न हे आयकर मर्यादेपेक्षा जास्त होते त्यांनी आपले आयकर खाते क्रमांक (PAN NO ) व बचतीसंदर्भातील सर्व प्रमाणपत्र कोषागार कार्यालयास सादर करावे . ज्या निवृत्तीवेतन धारकाचे या कार्यालयामार्फत आयकर कपात करण्यात येते त्यांना   फार्म क्र. १६ माहे एप्रिल मध्ये दि. २० नंतर  निर्गमित करण्यात येते.

११) ज्या निवृत्तीवेतन धारकांना वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा .

१२) निवृत्तीवेतन धारकाचा पत्ता बदलल्यास या कार्यालयाला तसे  कळवावे .

No comments:

Post a Comment