वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Wednesday, 23 April 2025

कोषागार कार्यालय / उपकोषागार कार्यालयामार्फत होणारी सर्व प्रदाने थेट अदात्याच्या बँक खात्यात जमा करणे बाबत.

संदर्भ:- 1. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १०१०/प्र.क्र.६८/ कोषा.प्रशा.५, दिनांक २२.०१.२०१३. 2. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २०२४/प्र.क्र.२०/ कोषा.प्रशा.५, दिनांक १६.०८.२०२४. परिपत्रक :- संदर्भिय शासन निर्णयान्वये शासनाने कोषागार कार्यालय / उपकोषागार कार्यालयामार्फत होणारी सर्व प्रदाने थेट अदात्याच्या बँक खात्यात प्रदान करणे बाबतचा निर्णय घेण्यांत आला आहे. सदर शासन निर्णयात प्रदान करण्याचे अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत सुस्पष्ट विवेचन नमुद करण्यांत आले आहे. तथापी महालेखाकार कार्यालयाचे लेखा परिक्षण अहवालात / उपकोषागाराचे उत्तर लेखा तपासणीत बहुतांश प्रकरणी असे निदर्शनास येते की, महालेखापाल कार्यालयामार्फत निर्गमित करण्यांत येत असलेल्या सेवानिवृत्तीविषयक लाभाचे प्रदान करतांना सेवानिवृत्तीधारक / कुंटूंब निवृत्ती धारक यांचे बाबतीत ( उदा.मृत्यु-नि-सेवा उपदान, भविष्य निर्वाह निधीचा अंतीम परतावा, गट विमा योजनेचा लाभ प्रदानाची देयके इत्यादी. ) तसेच इतर आकस्मिक खर्चाचे देयकात नमुद पुरवठादारास सरळ प्रदाने न करता आहरण व संवितरण अधिकारी यांचे खात्यात प्रदान झालेची प्रकरणे आढळून येतात. सदरची बाब नियमबाहय असल्याने आपणास याव्दारे निर्देशित करण्यांत येते की, यापुढे सर्व प्रदाने देयकात नमुद अदात्याच्या खाती प्रदान करण्याची कार्यवाही करावी. सदर परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे.

No comments:

Post a Comment